Tuesday, March 19, 2019

अंतरीच्या नाना कळा

या एकविसाव्या शतकामध्ये जागतिकीकरणाचा रेटा सर्वांना जाणवतोय. देशा-देशांधल्या अनेक प्रकारच्या नोकरी, व्यवसाय, व्यापार, खेळ, संशोधन, शिक्षण-स्पर्धांमध्ये टिकून राहणे अत्यंत गरजेचे झआलेले आहे. त्यावेळी आपले ज्ञान, कौशल्य, राहणीमान, बघताक्षणी छाप पाडणारी देहयष्टी आणि पेहराव, शिष्टाचार, बोलण्याची पद्धत या सगळ्या सगळ्याचा प्रभाव पडतो आणि त्यानुसार आपण पल्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात यशस्वी होते.
मात्र या बाबत आणखी विचार केल्यावर लक्षात येते की, हे सर्व असूनही काहीजण तितकेसे पुढे जात नाहीत, काहीजण अयशस्वी होतात, तर या गोष्टींमध्ये कमतरता असलेले काहीजण फार पुढे निघून जातात, प्रचंड यश कमवतात. असे कशामुळे होते ? यशस्वी व्यक्तींजवळ आणखी काय काय असते ? आपल्या बरोबरीच्यांपेक्षा ते आपापल्या क्षेत्रांमध्ये अधिक चमकतात कसे काय ? काही वेळा तर असे आढळून येते की, एकाच प्रकारचे शिक्षण घेतलेल्या आणि समान परिस्थितीतील दोन व्यक्तींपैकी एक नाव कमावते, समाधानी असते आणि दुसरी मात्र कुढत असते, मान्यता पावत नाही, असे का ? विविध पाहण्या केल्या असता याचे उत्तर मिळते की, याला कारण अंतरीच्या नाना कळा ! यशस्वी होणाऱ्यांनी आपल्या मधले विशेष मानसिक गुण ओळखले, तो जोपासून वाढवले, काही नव्याने आत्मसात केले, तर काही त्रासदायक मानसिक गुण प्रयत्नपूर्वक दूर केले. यामुळे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ शकली !
कोणत्या आहेत या अंतरीच्या नाना कळा ? त्या कशा विकसित होतात ? त्यासाठी कोणाचा हातभार लागतो ? शालेय पातळीवर याबाबत काय काय होते ? छात्रांचा आंतरिक विकास कस कसा करता येईल ?
  • अंतरीच्या नाना कळा
  • भाव-भावना आपल्या अंतरामध्ये किंवा मनामध्ये भावना असतात. त्याही धन किंवा ऋण म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक. समाधान, आशा, शांती, प्रसन्नता, आनंद, प्रेम, दर, कौतुक, उत्साह अशा धन तर मत्सर, चिंता, निराशा, किळस, राग, संशय, ताण, तिटकारा, दुःख, भीती अशा ऋण भावना आपल्या मनात असतात. बहुतेक वेळी भावनांची सरमिसळ झालेली असते. म्हणजे अनिषला त्याचे अध्यापक अविनाश सर यांच्याविषयी प्रेम वाटत असते आणि आदरही वाटत असतो. भावना अशा संमित्र असतात. त्यांची तीव्रताही कमी-जास्त असते. चीड, राग, संताप अशी भावनेची तीव्रता वाढत जाते. आपुलकी, जवळीक यापेक्षा प्रेमभावनेत उत्कटता अधिक आहे.
  • भावनिक परिक्रमता आपल्या धन आणि ऋण भावना ओळखता आल्या पाहिजेत. ऋण भावना कमी केल्या पाहिजेत आणि त्या इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यक्त झाल्या पाहिजेत. कबड्डीच्या स्पर्धेमध्ये हरल्यावर राग आला तर आरडा-ओरडा करणे, नावे ठेवणे यापेक्षा आपण का हरलो ते शोधून त्यावर मात करणे आणि पुढच्या वेळी नक्की जिंकू अशी ईर्ष्या मनात बाळगून रागाला विधायक वळण लावणे, हे व्हायला हवे. त्याचबरोबर इतरांच्या भाव-भावना कळल्या पाहिजेत. म्हणजे सहसंवेदना पाहिजे.
  • भावनांचा व्यक्तिमत्त्वावरील परिणाम भावनांचा व्यक्तिमत्त्वावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होतो. प्रसन्न, समाधानी आणि उत्साही व्यक्ती निरोगी तर असतेच आणि खूप कामही करू शकते. भावनांची घडी विस्कटलेल्या व्यक्तींच्या अपचन, डोकेदुखी, निद्रानाश, त्वचारोग,, एकाग्रता कमी होणे, थकवा येणे यासारख्या तक्रारी असू शकतात. म्हणजे धन भावनांचे प्राबल्य वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
भावना आणि समायोजन (अडदेस्टमेंट) हे एकमेकांशी निगडीत असतात. धन भावनांचे आधिक्य आणि त्यांची योग्य अभिव्यक्ती हे सुसमायोजनाचे तर ऋण कुसमायोजनाची लक्षणे आहेत.
भावनांची परिपक्वता आपल्या छात्रांमध्ये कशी निर्माण करता येईल ? त्यांच्या भावनांमध्ये संतुलन कसे साधता येईल ?
शालेय पातळीवर भावनिक विकास खरे तर कुटुंब आणि शाळा या दोघांचीही जबाबदारी आहे की, आपल्या मुला-मुलींचा भावनिक विकास उत्तमप्रकारे व्हावा. त्यासाठी पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत.
  • अनुकरण अध्यापक, पालक, नातेवाईक, मित्रमंडळी यांना आपली मुले निरखत असतात. त्यांना आदर्श समजत असतात आणि त्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे या सर्वांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणए आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे सर्वात महत्त्वाचे मुले नापास होतात, खोटे बोलतात, चुका करतात, हट्टीपणा करतात. याचा प्रौढांना खूप राग येतो. निराशा दाटून येते. अशा वेळी अद् वातद् वा बोलायचे, मारायचे की समजवायचे आणि मार्गदर्शन करायचे ? मुले बालीशपणे वागणार, तर समजूतदारपणा आपण दाखवायचा ना ? आपण प्रौढांनी विशिष्ट अवघड प रसंग समजून घ्यायचा, त्याचे विश्वेषण करायचे, त्यावर उपाय शोधून तो अंमलात आणायचा. या सर्वांमध्ये विवेकाचा म्हणजे बुद्धीचा वापर करायचा. भावनेला बुद्धीची जोड द्यायची.
अनुभव आपल्या मुलांना अनेकानेक भावनांचा विशेषतः धन भावनांचा अनुभव घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून द्यायच्या. यासाठी कितीतरी सहशालेय उपक्रम आपण घेतच असतो. उदाहरणार्थ शाळेमध्ये आपण अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतो. मैदानी, वक्तृत्व, लेखन अशा स्पर्धांमधून जिंकण्याची प्रेरणा, जिद्द, परस्पर तुलना करण्याची क्षमता, स्वतःला जोखणे, सराव करतांना चिकाटी अशा भावनिक आणि मानसिक गुण यांचा कस लागतो. अपयशाला समर्थपणे सामोरेसुद्धा जाता येते.
खो-खो, कबड्डी, क्रिकेट अशा प्रकारच्या सांघिक खेळांमधून सहकार्य,, सलोखा, शिस्त संघभावना वाढील लागते.
विविध प्रकारच्या कसरतींमुळे मुले मन एकाग्र करायला शिकतात.
छोट्या-छोट्या सहलींमुळे मुलांना खुले वातावरण मिळते, मनमोकळा संवाद होतो. तसेच परस्परांशी जवळीक वाढते. प्रवास, निवास, सभोवतालची मंडळी यांच्याशी जुळवून घेणे शिकता येते. सहलीच्या वेळी पावसात भिजणे, पोहणे, अनुपम अशी निसर्गदृष्ये पहाणे, गाणी म्हणणे, खोड्या काढणे, दंगा करणे या सर्वांमधून मुलांना किती आनंद मिळतो, त्याचे वर्णन करणेही अवघड आहे. त्यामुळे सहलीचे नाव काढले की मुले हर्षाने आरडा-ओरडा करून वर्ग डोक्यावर घेतात !
दरवर्षीच्या स्नेहसंमेलनांमधून कला गुणांना वाव मिळण्याबरोबरच मुले कौतुक करणे, रसग्रहण करणे, सौंदर्याचा आस्वाद घेणे हेही शिकतात. परस्पर स्नेह वाढतो, हे सांगायला नकोच ! विद्यार्थी दिन ही तर मुलांना एक मोठी संधी सते. विद्यार्थ्यांनीच शिक्षक होऊन शिकवायचे ! यातून त्यांना जबाबदारीची जाणीव होते, शिक्षकांची भूमिका आणखी चांगल्या प्रकारे समजू लागते.
प्रदर्शन हे शास्त्रातील प्रयोगांचे असो, हस्तकलेचे असो किंवा रांगोळीचे असो त्यामधून ज्ञान आणि कलेबरोबरच इतरही मानसिक गुण वाढतात. मुले चिकाटीने काम करतात, सुंदर सजावट करतात, अर्थपूर्ण मांडणी करतात, उत्साहाने निवेदन करतात.
अशाप्रकारच्या भावना अनुभवणे आणि त्यांची योग्य अभिव्यक्ती याचे शिक्षण छात्रांना शाळेत मिळते. मात्र यावेळी प्रश्न पडतात की, असे सहशालेय उपक्रम अध्यापक पार पाडायचे म्हणून पार पाडतात की, छात्रांचा मानसिक विकास व्हावा, हा ठळक हेतू मनात ठेवून करतात ? या उपक्रमांमध्ये जास्तात-जास्त मुलांचा सहभाग असतो की, ठराविकच थोडी मुले पुढे-पुढे असतात ? खरंच किती मुला-मुलींचा आणि किती प्रमाणात विकास झाला आहे, याची पाहणी कुणे करते का ? अध्यापकांना तरी या सर्वांसाठी सवड असते का, की त्यांच्यावर हा जास्तीचा बोजा पडतो ? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत.
स्वभाव एखादी भावना जेव्हा थोडा वेळ सनात रेंगाळते, तेव्हा तिला मनःस्थिती (मूड) म्हणतात. ती तेव्हा वारंवार प्रकट होते, तीव्रतेने दिसून येते, तेव्हा ती स्वभाव म्हणून ओळखली जाते. प्रेमळ, रागीट,, संशयी, भित्रट असे स्वभाव आहेत, असे पण म्हणतो. मग शालेय वयामध्ये छात्रांच्या मनात धन भावना जास्त काळ रेंगाळू देणे वश्यक ठरते, म्हणजे ती विधायक (पॉझिटिव्ह) वृत्तीची बनतील. अन्यथा भोवतालच्या परिस्थितीच्या रेट्यामुळे गुंडगिरी, नैराश्य यांची बळी होतील.
अस्मिता अंतरीच्या नाना कळांमध्ये अस्मिते ची भूमिकाही फार मोठी आहे. आपण विविध प्रकारचे अनुभव घेत असतांना स्वतःला विविध संदर्भांमध्ये पहात असतो. स्वतःला काही वाटत असते, काही विचार करत सतो. हे सर्व कोण करते ? हे मी करतो किंवा करते.
ही मी पणाची कल्पना म्हणजे अस्मिता. हे माझे आहे, ते मी केले आहे असा भाव आपल्या मनात असतो. मी कशी दिसते, माझा स्वभाव असा आहे असा विचार आपल्या मनात असतो. हे सगळे अस्मितेचे आविष्कार आहेत. आपण स्वतः स्वतःला ओळखत असतो. त्याचबरोबर इतरांचे आपल्याविषयी काय म्हणणे आहे, यातून अस्मिता साकार होते.
ही अस्मिता प्रामुख्याने लहानपणी घडते. ती सर्व मानसिक आणि शारीरिक प्रक्रियांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे आपल्या कृतींचे नियंत्रण ती करते. किंबहुना आपल्या आयुष्याचे नियंत्रण असमितेमुळे होते, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे ती सार्थ हवी, यथायोग्य हवी. आपण आहोत त्यापेक्षा स्वतःला कमी लेखले तर न्यूनगंड निर्माण होतो आणि वरचढ लेखले तर अहंगंड निर्माण ह तो. दोन्हीही नकोत. असमिता ही वास्तव हवी, आपणा जसे आणि जितके आहोत, तसे आणि तेवढे स्वतःला मानायला हवे.
अशी वास्तव असमिता निर्माण होम्यासाठी वैयक्तिक बोलणे, गप्पा होणे आवश्यक आहे. त्यासाठी 70-80 छात्रांच्या वर्गामध्ये अध्यापकांना कसा वेळ होणार ? मानसशास्त्रीय चाचण्यांमधून स्वतःचा स्वभाव, समायोजन, बुद्धिमत्ता, मूल्ये, आवड-निवड यांचे शास्त्रशुद्ध मोजमाप होऊ शकते आणि जणू आरशातील प्रतिबिंबासारखे अंतरीच्या नाना कळांचे प्रतिबिंब आपण पाहू शकतो. पण हे अत्यंत खर्चिक आहे. ते आपल्या सर्वांना कसे परवडणार ? आणि त्यामुळे वास्तव असमितेची निर्मिती हा शालेय पातळीवर दुर्लक्षिलेला भाग आहे. आपोआप जे साधेल ते साधेल !
प्रतिभा – अनेक संशोधनांच्या निष्कर्षांनंतर अत्यंत महत्त्वाची पण शालेय शिक्षणामध्ये अत्यंत दुर्लक्षिलेली क्षमता म्हणजे प्रतिभा. आकलन, स्मरण आणि काही प्रमाणात तर्क याच क्षमतांचा विकास शाळेमध्ये होतो. अध्यापकांचे अध्यापन, पुस्तकांचे पठण यांतून छात्र भारंभार माहिती लक्षात ठेवतात आणि परिक्षांमध्ये ती ओकतात ! शेकडो परिक्षांमध्ये हेच चालतो. याशिवाय कॉपी करण्याचा सराव असेल तर स्मरणशक्तीला ताण देण्याचीही गरज भासत नाही !
मात्र जीवनातल्या अनेक समस्यांना नावीन्यपूर्ण उत्तरांचा उतारा हवा असतो. तरच प्रगती होते. यश मिळते. इथे आपले शिक्षण थिटे पडते. याबाबत दिलासा देणारी गोष्ट म्हणजे प्रतिभेचा विकास हा जाणीवपूर्वक आणि अनेक तंत्रांचा वापर करून करता येतो, हे सिद्ध झालेले आहे. अध्यापकांनी त्याची माहिती करून घेतल्यास रोजच्या अध्यापनामधून ही छात्रांची प्रतिभा विकसित होऊ शकते. याशिवाय प्रतिभेला चालना देणारे उपक्रमही शाळेमध्ये आखता येतील.
मूल्ये - सत्य, सेवा, त्याग, अहिंसा, देशभक्ती, मानवता, भूतदया, समानता अशा अनेक नैतिक मूल्यांचे अंतरंगातील महत्त्व कोम नाकारेल ? प्रत्येकजण आपापले व्यक्त किंवा अव्यक्त असे ध्येय ठरवतो आणि त्यानुसार उठल्यापासून झोपेपर्यंत आपण वागतो, सर्व आयुष्य त्यानुसार घालवतो. आपण का जगतो आणि कसे जगतो तेही मूल्ये आणि आपले ध्येय हे ठरवतात.
शाळेमध्ये मूल्यशिक्षणाचे तास असतात, प्रार्थना होतात, श्रेष्ठ व्यक्तींच्या स्मरणदिनी काही विशेष उपक्रम केले जातात, थोरा-मोठ्यांच्या चरित्रांचे वाचन, श्रवण होत असते. याद्वारे छात्रांमध्ये मूल्ये रुजवली जातात. मूल्यांबाबतही म्हणावे लागते की, छात्रांसमोर अनुकरण करण्यासाठी सभोवताली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे हवीत. तशी ती आहेत का ? तशी ती असली तरी डोनेशन, कॉपी, लाचलुचपत, राजकारणाचा धुराळा यांच्या लाटांपुढे किती प्रभावी ठरतील, हाही एक प्रश्न आहे.
श्लोक, मंत्र यांचे पठण, उपासना, ध्यान यांचाही अनुभव मिळायला हवा. ताणाला समर्थपणे सामोरे जाणे, भावभावनांवरचे नियंत्रण येणे, सारासार विवेक करणे असा लाभ तरी त्यांना निश्चित मिळू शकेल.

ज्ञान प्रबोधिनी